अवघ्या ६0 रुपयांसाठी खून!

By Admin | Updated: June 15, 2016 01:59 IST2016-06-15T01:59:22+5:302016-06-15T01:59:22+5:30

शेगाव तालुक्यातील खातखेड येथील ५0 वर्षीय इसमाचा फक्त ६0 रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून खून.

Only 60 rupees for blood! | अवघ्या ६0 रुपयांसाठी खून!

अवघ्या ६0 रुपयांसाठी खून!

शेगाव : तालुक्यातील खातखेड येथील ५0 वर्षीय इसमाचा फक्त ६0 रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खातखेड शिवारात सोमवारी संशयास्पद अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सदर घटना उजेडात आली. खातखेड येथील जगन्नाथ तुळशीराम गुळभेले असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची तक्रार मृताचा भाऊ एकनाथ गुळभेले यांनी ग्रामीण पो.स्टे. ला दिली की, माझा भाऊ जगन्नाथ याच्यासोबत गावातील विष्णू दयाराम तलवारे याने ६0 रुपयाच्या घेवाण-देवाणवरून सोमवारी दुपारी वाद केला व त्याच्या डोक्यात लाकडी झिलपी मारून जखमी केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी विष्णू तलवारे, (वय ४५) याच्या विरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Only 60 rupees for blood!