शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:26 IST

Samruddhi highway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड  यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही. 

- आशिष रॉय

नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ ४५ किलोमीटरचे काम बाकी राहिले आहे. हा ५३० किलोमीटरचा टप्पा आहे. या टप्प्याचे काम मे-२०२१ पर्यंत पूर्ण करायचे होते; परंतु कोरोनामुळे डेडलाइन पाळता आली नाही. संपूर्ण महामार्ग डिसेंबर-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांना अशा ठिकाणी वळण घेऊन पुढे जावे लागेल. पुलांचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार-पाच महिने वेळ लागेल. या टप्प्यामध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव टनेलचे काम पूर्ण झाले आहे.  हा ५५ हजार ३२२ कोटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या आठ पदरी महामार्गाची रुंदी २२.५ मीटर आहे. महामार्गाची उंची ४ ते १२ मीटरपर्यंत राहणार आहे, तसेच महामार्गाला संरक्षक भिंत बांधली जाईल. त्यामुळे जनावरे व पादचाऱ्यांना रोडवर येता येणार नाही. महामार्गावर कमाल १५० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहन चालवता येईल. त्यामुळे नागपूर- मुंबई हे ७०१ किलोमीटर अंतर केवळ ८ तासांत, तर नागपूर- औरंगाबाद अंतर ४ तासांत पूर्ण करता येईल. परिणामी, विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. 

अशी आहेत वैशिष्ट्येहा महामार्ग दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, दी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, वर्धा व जालना येथील ड्राय पोर्टस् आणि मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या औद्योगिक क्षेत्रांना एकमेकांशी जोडणार आहे. 

महामार्गावर १७ गृहप्रकल्पही उभारले जाणार आहेत. त्यापैकी ९ प्रकल्प विदर्भात आहेत. एक नागपूरजवळ आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड राहणार आहेत. ते अंडरपासेसने जुळलेले राहतील. 

सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येकी पाच किलोमीटरवर मोफत टेलिफोन बूथ राहतील. ऑप्टिक फायबर केबल, गॅस पाइपलाइन, वीज लाइन इत्यादीसाठी विशेष जागा सोडली जाईल. महामार्गावर येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी २५ मार्ग राहतील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग