शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महारेराकडे अद्याप नोंदणी न केलेल्या प्रकल्पांची इथे माहिती द्या... मुंबई ग्राहक पंचायतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 22:28 IST

अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात महारेरा आघाडीवर असले तरीही रेरा कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत आजही घर खरेदीदारांच्या बऱ्याच तक्रारी आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई ग्राहक पंचायत’ एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. 

 अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  तसेच घर खरेदीदारांकडून मूळ किंमतीच्या 10% हून जास्त रक्कम घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक तो विक्री करारही अनेक विकासकांनी केलेला नाही. विक्री करार नसला तर अशा ग्राहकांना महारेरात आपल्या तक्रारींची तड लावून घेण्यात अडचणी उभ्या केल्या जात असल्याचेही आढळून आले आहे.

 या पार्श्वभूमीवर ‘मुंबई ग्राहक पंचायत’ एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातून गोळा करण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्राहकांनी एकूण रकमेच्या 10% पेक्षा जास्त रक्कम भरूनही विकासकांनी विक्री करारनामा केलेला नाही त्या विकासकांची माहिती सुद्धा या सर्वेक्षणातून गोळा करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे मुंबई ग्राहक पंचायत हे दोन्ही प्रश्न महारेराकडे धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

 संबंधित घर खरेदीदार ग्राहक या सर्वेक्षणात  https://survey.mumbaigrahakpanchayat.org या लिंक वर जाऊन सहभागी होऊ शकतील. हे सर्वेक्षण दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजल्यापासून ते 10 ऑक्टोबर सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत ग्राहकांना उपलब्ध असेल. ग्राहकांना स्मार्ट मोबाईल फोनवरुनही या सर्वेक्षणात ग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ पाच ते सात मिनिटात या सर्वेक्षणात विचारलेली सर्व माहिती ग्राहकांना देता येणार आहे.

 तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीनचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Mumbaiमुंबई