दहावीचा उद्या आॅनलाइन निकाल

By Admin | Updated: June 7, 2015 03:19 IST2015-06-07T03:19:49+5:302015-06-07T03:19:49+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (८ जून) दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

Online result of Class X tomorrow | दहावीचा उद्या आॅनलाइन निकाल

दहावीचा उद्या आॅनलाइन निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (८ जून) दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित शाळांमधून १५ जून रोजी दुपारी ३ वाजता केले जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून १६ लाख ३१ हजार ८७२ नियमित आणि १ लाख १ हजार २६ पुनर्परीक्षार्थी अशा एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकालाची प्रत घेता येईल. (प्रतिनिधी)

निकालासाठी संकेतस्थळ...

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams

Web Title: Online result of Class X tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.