शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन गेमर्स’ आयकरच्या रडारवर, तीन वर्षांत ५८ हजार कोटी जिंकले; कर भरण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 09:45 IST

गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाइन गेम्स सादर केले आहे. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना घसघशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे.

मुंबई : वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन गेम खेळत पैसे कमाविणारे ‘खेळाडू’ आता आयकर विभागाच्या रडारवर आले असून, या लोकांनी बक्षिसापोटी मिळविलेली रक्कम स्वतःहून जाहीर करत त्यावर लागू असलेला कर भरणा करावा, अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे. गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन गेमच्या माध्यमातून तब्बल ५८ हजार कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण बक्षिसापोटी झालेले असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिली असून, त्या अनुषंगाने आता मंडळाने हा कारवाईचा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाइन गेम्स सादर केले आहे. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना घसघशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे. ऑनलाइन गेम्स प्रकारावर कंपन्यांना जीएसटी भरावा लागतो. तर जे ग्राहक या खेळातून बक्षिसापोटी पैसे मिळवतात, त्या रकमेवर ३० टक्के कराची आकारणी करण्याची तजवीज आयकर कायद्यामध्ये आहे. मात्र, ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लाखो लोकांनी बक्षिसे जिंकूनही कर भरणा केला नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यातच केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून बक्षिसापोटी तब्बल ५८ हजार कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे. मात्र, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचा आर्थिक व्यवहार, त्याद्वारे त्यांच्याकडून भरला गेलेला जीएसटी आणि बक्षिसांचे केलेले वितरण आणि त्याद्वारे खेळाडूंकडून अपेक्षित असलेला आयकर याचा मेळ बसत नसल्यामुळे लाखो लोकांनी कर चुकवेगिरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर, आता आयकर विभागाने ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. देशात सुमारे ८० लाख लोक नियमित ऑनलाइन गेम खेळतात.  

किती आणि कसा कर भरावा लागेल ?- ऑनलाइन गेमिंगद्वारे मिळालेल्या रकेमवर ३० टक्के कर आकारणी आहे. - ज्यांनी नियमित विवरणात याची माहिती दिलेली नाही, अशा लोकांना आता ३० टक्के करासोबत २५ टक्के रक्कम दंडापोटी भरावी लागेल.- ऑनलाइन गेम खेळणाऱ्या लोकांना आयटीआर- यू अर्थात आयकराचे अपडेटेड विवरण भरून त्याद्वारे ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेल्या पैशाची माहिती द्यावी लागेल. तसेच, अनुषंगिक करभरणा करावा लागेल. 

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Taxइन्कम टॅक्स