ऑनलाइन फसवणुकीचे बिहारी धडे!

By Admin | Updated: August 22, 2014 00:19 IST2014-08-22T00:19:34+5:302014-08-22T00:19:34+5:30

आयटी सीटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.

Online Behavior Lessons! | ऑनलाइन फसवणुकीचे बिहारी धडे!

ऑनलाइन फसवणुकीचे बिहारी धडे!

पुणो : आयटी सीटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामध्ये पुण्यातील नागरिकांची बिहारमधून ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एकूणच उत्तर प्रदेश, बिहार आदी परप्रांतांमधून  फसवणूक करणा:या टोळ्या कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
एखाद्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि एखाद्या बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती विचारली जाते. एटीएम आणि डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून खात्याची माहिती घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांत तुमचे कार्ड पुन्हा सुरू होईल, असे सांगून फोन बंद केला जातो. काही वेळातच आपल्या खात्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची माहिती मिळते आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते. हा अनुभव गेल्या काही महिन्यांपासून पुणोकर घेत आहेत. खोटय़ा फोन कॉल्सद्वारे अनेकांची बचत खाती रिकामी करण्यात आल्याच्या घटना वारंवार घडत 
आहेत. 
ई-मेल आणि फोन कॉल्स अथवा मेसेज पाठवून अशा प्रकारची फसवणूक केली जात आहे. विविध बँकांच्या खातेदारांना मोबाईलद्वारे संपर्क साधला जातो. आपण भारतीय रिझव्र्ह बँकेचा अथवा राष्ट्रीय बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जाते. तुमचे कार्ड लॉक झाले आहे. ते तुम्ही आता वापरू शकणार नाही, अशा प्रकारे भीती दाखवली जाते. गोड गोड बोलून अधिकच भीती घातली जाते. त्यांच्या बतावणीला भुललेल्या व्यक्तीकडून मग डेबिट अथवा क्रेडिट कार्डवर असलेला 16 आकडी क्रमांक विचारून घेतला जातो. त्यानंतर कार्डाची ‘व्हॅलीडिटी’ विचारली जाते. कार्डाच्या  पाठीमागे असलेला सहा किंवा सात आकडी क्रमांक विचारून घेतला जातो. ही माहिती विचारून घेतल्यानंतर कार्डाचा पिन क्रमांक विचारला जातो. मूळ पिन क्रमांक बदललेला असून, नवीन पिन क्रमांकाचा मेसेज काही वेळातच तुम्हाला मिळेल, अशी थाप मारली जाते. 
पिन बदलल्याच्या मेसेजची वाट पाहत बसलेल्या खातेधारकाच्या खात्यामधून असतील तेवढी रक्कम काही क्षणांतच लंपास केलेली असते. पुण्यामध्ये गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारच्या 1क्क् च्या आसपास तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. परराज्यात बसून हे चोरटे पुणोकरांचे बँक खाते रिकामे करीत आहेत. विशेष म्हणजे या सुशिक्षित भामटय़ांच्या भुलाव्याला सुशिक्षितच बळी पडत आहेत. पोलिसाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण यात अधिक आहे. पोलीसही थेट गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी तक्रार अर्जावरच भागवत असल्याने गुन्ह्यांचे गांभीर्य कमी होत आहे. अन् लोकांची कष्टाची कमाई अवघ्या काही क्षणांतच गायब होत आहे.
खातेदारांच्या खात्यामधून गायब होणा:या या रकमांमधून भामटे मोठमोठी खरेदी करतात. पोलीस मात्र अभावानेच या भामटय़ांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतात. खातेदाराच्या ई-मेल आयडीवर ई-मेल करून माहिती व फॉर्म भरून पाठवण्यास सांगितले जाते. किंवा फोनऐवजी नुसता मेसेज करण्यासही सांगण्यात येते. मुळात या भामटय़ांना बँकेच्या खातेदारांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी मिळतात कसे, हा महत्त्वाचा विषय आहे. (प्रतिनिधी)
 
च्क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती विचारून रक्कम लंपास झाल्यानंतर फसवणुकीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला स्थानिक पोलिसांकडून विचित्र अनुभव येतात. हा गुन्हा आपल्या हद्दीत येत नाही, तुमची बँक कुठे आहे मग तिकडे जाऊन तक्रार करा, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. 
च्तक्रारदाराने फारच लावून धरले तर थेट गुन्हा दाखल करण्याऐवजी तक्रार अर्जावर त्याची बोळवण केली जाते. पोलीस चौकी आणि पोलीस ठाणो स्तरावरची गुन्हे दाखल करण्याबाबतची तसेच तपासाबाबतची उदासीनता अशा गुन्ह्यांचे पेव फुटण्यामागील एक कारण आहे. 
 
आठ दिवसांनंतरही कारवाई नाहीच
च्मोबाईलवर संपर्क साधून एटीएम कार्डाची माहिती विचारून घेतल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी दत्तात्रय पर्वती बोडके (रा. न:हे, आंबेगाव) यांच्या खात्यामधून 19 हजार रुपये काढण्यात आले. फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या आंबेगाव चौकीमध्ये ते गेले. तेथील पोलीस कर्मचारी धोत्रे आणि सुर्वे यांनी आपली हद्द नसल्याचे सांगत त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील एका कर्मचा:याने ‘तुझी फसवणूक किरकोळ स्वरूपाची आहे, लोकांचे वीस वीस लाख जातात. तू फसवला गेला आहेस, विसरून जा,’ असे सांगत त्यांना परत पाठवले.
च्त्यानंतर बोडके यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सूचनांनुसार त्यांनी पोलीस आयुक्तालयातील एक खिडकीमध्ये 12 ऑगस्ट रोजी अर्ज दिला. परंतु आठ दिवस उलटून गेले तरीदेखील हा अर्ज अद्याप पोलीस ठाण्याला गेलेला नाही. तसेच सायबर गुन्हे शाखेकडूनही या अर्ज संदर्भात बोडके यांना संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस याकडे किती गांभीर्याने पाहतात, हा खरा प्रश्न आहे.
 
बँक जबाबदार?
क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माहितीच्या माध्यमातून खातेदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. खातेदारांना अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते, याची माहिती देण्याची तसदी बँकांकडून घेतली जात नाही. 
या बाबतीत खातेदारांमध्ये जागृती व्हावी याकरिता सूचना फलक लावणो, त्या आशयाचे मेसेज पाठवणो या गोष्टी होणो आवश्यक आहे. 
सर्वसामान्य खातेधारकांना केवायसीच्या नावाखाली वेठीस धरणा:या बँका अशा भामटय़ांची बनावट खात्यांना मात्र केवायसीची अट कशी शिथिल करतात, हा प्रश्न आहे. 
 
सायबर सेलकडील तक्रारी 
प्रकार 20112012 2013 
क्रेडिट व डेबिट कार्ड फसवणूक55 4732 
बँक ऑनलाइन फसवणूक4832 18 
फेसबुकबाबत अजर्75 9467 
ई-मेलवरून त्रस देणो4511 65 
मोबाईलवरून त्रस 2709 17 
लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक29 17 14 
ऑनलाइन नोकरीचे आमिष28 07 16 
एकूण 307 217 229
 
एटीएम कार्डबाबत ही घ्या काळजी
च्कोणत्याही कार्डाची माहिती कोणलाही फोनवर देऊ नका.
च्खाते बंद करण्याची अथवा कार्ड बंद करण्याची धमकी दिल्यास त्याला घाबरु नका.
 
च्तातडीने आपल्या बॅंकेशी संपर्क साधा.
च्बॅंकेच्या अधिका-यांशी संपर्क साधून एटीएम अथवा क्रेडीट कार्डचा पिन क्रमांक बदलून घ्या.
 
च्ज्या मोबाईलवरुन फोन येईल तो क्रमांक पोलिसांना द्या.
च्जे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतील त्यांची नावे आणि माहिती पोलीस आयुक्तालयाला कळवा.

 

Web Title: Online Behavior Lessons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.