कांद्याला मार्च महिन्यात मिळणार प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दर!

By Admin | Updated: November 11, 2015 01:14 IST2015-11-10T21:17:48+5:302015-11-11T01:14:44+5:30

कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी आणि केंद्रीय कृषी विपणनचा अंदाज.

Onion prices will be Rs. 2 thousand rupees in March! | कांद्याला मार्च महिन्यात मिळणार प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दर!

कांद्याला मार्च महिन्यात मिळणार प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दर!

अकोला: येत्या मार्च २0१६ मध्ये कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्विंटल १९00 ते २000 रुपये दर मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग व दिल्ली येथील केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे.
कांदा उत्पादनात भारत हा जगात दुसर्‍या क्रमांकावर असून, भारतातील कांद्याला मलेशिया, बांग्लादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात खूप मागणी आहे. भारतात कांदा उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, उत्पादनातील वाटा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा आहे. या राज्यात कांदा पिकाखालील क्षेत्र हे ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्ट्राखेरीज कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा कांदा उत्पादन घेणारे हे महत्त्वाचे राज्य आहे. राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास संशोधनानुसार महाराष्ट्रात २0१४-१५ मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र ११.८0 दशलक्ष हेक्टर होते. तर उत्पादन १८९२३ दशलक्ष टन होते. २0१३-१४ मध्ये हेच क्षेत्र १२.0३ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन १९४.0१ दशलक्ष टन एवढे होते.
दरम्यान, यावर्षी अपेक्षित कांद्याचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन केंद्र व नवी दिल्ली येथील कृषी विपणन केंद्राच्या चमूने कांदा या पिकाच्या नाशिक जिल्हय़ातील लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांच्या कालावधीतील मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले असून, या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारातील चालू किमती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतवारीनुसार येणार्‍या मार्च २0१६ मध्ये कांद्याची सरासरी किंमत प्रतिक्विंटल १९00 ते २000 रुपये राहण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्य:स्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो.
खरीप कांद्याला येत्या नोव्हेंबर महिन्यात १९00 ते २000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्य:स्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो. या माहितीमुळे पीक पेरणीचा व निविष्ठा वापराचा योग्य निर्णय शेतकर्‍यांना घेता येत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सांगीतले.

 

Web Title: Onion prices will be Rs. 2 thousand rupees in March!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.