शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे अनुदान फेब्रुवारीत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:20 IST

प्रतिक्विंटल २०० रुपये; ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले

पुणे : कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत २५ जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकºयांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना राज्य शासनातर्फे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारले. मात्र, आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागत असल्याने पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविली. १५ जानेवारीपर्यंत सुमारे सव्वालाख शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले होते. पुढील दोन ते तीन दिवसांत २५ जानेवारीपर्यंत किती शेतकºयांनी अर्ज केले आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अनुदान अर्जासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शासनातर्फे शेतकºयांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) अनंत कटके म्हणाले की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकºयांनी या कालावधीत कांदा विक्री केली. काही शेतकºयांकडे कांदा विक्रीच्या दोन हे तीन पट्ट्या होत्या. मात्र, प्रत्येक शेतकºयाकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला. त्यातच कोल्हापूर, अहमदनगर, सातारा यांसह इतर जिल्ह्यांमधील शेतकºयांनीसुद्धा पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली; मात्र अनेक शेतकºयांनी अनुदानासाठी अर्जकेले नाहीत.सहा कोटी निधीचा प्रस्तावशेतकºयांकडून अजूनही अर्ज स्वीकारले जात असून, अर्ज स्वीकृतीसाठी शासनाकडून मुदत वाढवून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु २५ जानेवारीपर्यंत पुण्यात अर्ज केलेल्या ८ ते ९ हजार शेतकºयांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर केला आहे.शेतकºयांना २५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. पुढील दोन दिवसांत राज्यातील एकूण किती शेतकºयांनी अनुदानासाठी अर्ज केले आहे, याबाबतची माहिती प्राप्त होईल. अर्ज केलेल्या शेतकºयांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल.- दीपक तावरे,पणन संचालक

टॅग्स :onionकांदा