शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

बंगळुरूला कांदा नेणाऱ्या शेतकऱ्यांची झाली परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:46 AM

आतबट्ट्याचा व्यवहार : परतीच्या प्रवासासाठी हात पसरण्याची वेळ

- अरुण बारसकर

सोलापूर : महाराष्ट्रात कांद्याला दर मिळेना म्हणून कर्नाटकातील बंगळुरु मार्केट यार्डात ट्रकने कांदा घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरू मार्केटमध्ये देशभरातून कांदा घेऊन आलेल्या ट्रकच्या लांबचलांब दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कांदा ठेवायला जागाच नसल्याने नंबर येणार कधी आणि भाव मिळणार किती, याची काहीच शाश्वती नसल्याने कांदा घेऊन परतीचा प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी पैसे मागविले आहेत.

सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून बंगळुरू मार्केटमध्ये कांदा जातो. सध्या तेथे कांदा उरतण्यासाठी जागा नसल्याने बाहेर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी २०० ते ६०० रुपये दर मिळाला. काही कांदा प्रति क्विंटल ८०० रुपयानेही विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरहून बंगळुरूला कांदा वाहतुकीसाठी प्रति टन २४०० रुपये भाडे घेतले जात आहे. एका ट्रकचे वाहतुक भाडे किमान ५६ हजार रुपये मोजावे लागते. शिवाय हमालीही द्यावी लागते. ज्यांच्या कांद्याला २०० व ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यांना पदरमोड करावी लागत आहे.खाते-पोते बार झाले अन्...गावडीदारफळचे अर्जुन पवार, धर्मराज पवारसह चार शेतकरी एका ट्रकमध्ये कांदा बेंगलोरला विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये, ३०० रुपये, ३५० रुपये व ४०० रुपये दर मिळाला. ट्रकचे भाडे व बेंगलोरला जाण्यासाठी झालेला वैयक्तिक खर्च वजा जाता आतबट्ट्याचा व्यवहार झाला. कांदा उत्पादन, कांदा कापणी व भरणीचा खर्च आम्हाला सोसावा लागला, असे पवार म्हणाले. 

गुरुवारी रात्री कांदा भरुन गेलेला ट्रक शनिवारी बंगळुरुला पोहोचल्या. सोमवारी विक्री झाली. ११८ पिशव्याचे १२ हजार ५०० रुपये गाडी गेले. चार दिवसाचा खर्च वगळता हातात काहीच राहीले नाही.- श्रीकांत ननवरेकांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :onionकांदाSolapurसोलापूरBengaluruबेंगळूर