कांदा बी होणार झटक्यात वेगळे !

By Admin | Updated: December 28, 2014 23:55 IST2014-12-28T23:55:02+5:302014-12-28T23:55:02+5:30

पंदेकृविने केले कांदा निष्कासन यंत्र विकसित.

Onion B is different from the shock! | कांदा बी होणार झटक्यात वेगळे !

कांदा बी होणार झटक्यात वेगळे !

अकोला : राज्यात कांदा पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून, कांदा पुष्प आणि बी वेगळे करणे मात्र शेतकर्‍यांच्यादृष्टीने अत्यंत अवघड बाब आहे. आता मात्र झटक्यात बी आणि पुष्प वेगळे करता येणार आहे. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कांदा निष्कासन यंत्र विकसित केले आहे. राज्यात कांदा क्षेत्र विदर्भ, मराठवाड्यात मोठय़ाप्रमाणावर वाढत आहे; परंतु कांदा पुष्पातून बी वेगळे करण्यासाठी शेतकर्‍यांना थ्रेशरचा वापर करावा लागत आहे. या प्रक्रियेत कांदा बियाण्यांचे १0 टक्केच्यावर नुकसान होत असून, उगवणशक्तीवर त्याचे विपरित परिणाम होत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कांदा निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्रात कांदा बीजपुष्प टाकून बी आणि पुष्प वेगळे केले जाते. या यंत्रात प्रतितास १00 किलो पुष्पबीजाची मळणी करू न ५३ किलो कांदा बी काढल्या जाते. या यंत्राच्या ड्रममध्ये चामड्याचे (लेदर)पट्टे लावलेले असल्याने बी खराब होत नाही आणि या यंत्रातून काढलेल्या बियाण्यांच्या उगवणशक्तीवर परिणाम होत नाहीत, या यंत्राला एक अश्‍वशक्ती विजेच्या मोटरची गरज असून, सिंगलफेज मीटरवर हे यंत्र चालू शकते, या यंत्राची किंमत शेतकर्‍यांना परवडणारी आहे. शेतकरी बचत गटांना या यंत्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच या यंत्रावर दिवसभर एक यंत्रचालक हवा असल्याने एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या यंत्राचा विकास करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने लवकरच काही खासगी कंपन्याशी करार करण्यात येणार असून, हे यंत्र लवकरच शेतकर्‍यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या कृषी विद्यापीठाने अलीकडे कृषी औजारे आणि कृषी यंत्र विकासावर अधिक भर दिला असून, शेतकर्‍यांना या यंत्राचा वापर करता यावा, यासाठी या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आहे. अत्यंत स्वस्त आणि कांदापुष्पासून बीज वेगळे करणारे कांदा निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे बियांचे नुकसान होत नसून, उगवणशक्ती चांगली राहते, लवकरच हे यंत्र शेतकर्‍यांना उपलब्ध करू न दिले जाणार असल्याचे कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांनी सांगीतले.

Web Title: Onion B is different from the shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.