शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 07:04 IST

Vegetable Price Hike: निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण  ५०० रुपये दराने विकला जात आहे.

 नवी मुंबई - निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण  ५०० रुपये दराने विकला जात आहे. निवडणुकीच्या काळात भाववाढ सुरू असल्याने नागरिकांच्या नाराजीच्या रोषामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झाला असून आवक कमी होऊ लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ८३३ टन आवक झाली. एक आठवड्यापूर्वी बाजार समितीत कांदा १८ ते ४८ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर ३५ ते ६२ वर पोहचले आहेत.  किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७५ ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. वाशी सेक्टर १७ या उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये हेच दर १०० रुपये किलो एवढे आहेत.  अजून दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एक वर्षापासून लसूणचे दर तेजीत आहेत.  बुधवारी बाजार समितीमध्ये लसूण २२० ते ३२० रुपये किलो दराने विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण  ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. नवीन वर्षात नवीन पीक बाजारात येईपर्यंत लसूणची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.

वाटाणाही २५० पार...- हिरव्या वाटाण्याचाही मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. बाजार समितीमध्ये वाटाणा  १६० ते २०० रूपये किलो दराने विकला जात आहे. - किरकोळ मार्केट मध्ये हेच दर २५० रूपये किलोपर्यंत पोहचले आहेत.  - किरकोळ मार्केट मध्ये मेथीची जुडीही ३० रूपये किलो दराने विकली जात आहे.  शेवगा शेंगाचे दर किरकोळ मार्केटमध्ये  १३० रूपयांवर पोहचले असून वालाच्या शेंगा १२० रूपयांवर पोहचल्या आहेत.

टॅग्स :Inflationमहागाईmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vegetableभाज्या