गणपतीपुळे येथे एकजण बुडाला
By Admin | Updated: May 20, 2016 14:17 IST2016-05-20T13:02:01+5:302016-05-20T14:17:07+5:30
पर्यटकाला घेऊन स्पीडबोटने समुद्रात गेलेला तरूण जेटस की (पाण्यातील मोटारसायकल) उलटल्याने बुडून मरण पावला.

गणपतीपुळे येथे एकजण बुडाला
>ऑनलाइन लोकमत
गणपतीपुळे, दि. २०- पर्यटकाला घेऊन स्पीडबोटने समुद्रात गेलेला तरूण जेट स्की (पाण्यातील मोटारसायकल) उलटल्याने बुडून मरण पावल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. चालक बुडाला तरी लाईफ जॅकेट घातले असल्याने पर्यटकाचा जीव मात्र वाचला आहे.
सुट्टीचा हंगाम असल्याने गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. जल क्रीडा प्रकारांना येथे पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील एक तरूण नीलेश थेऊर जेट स्की (पाण्यातील मोटारसायकल) घेऊन पर्यटकांना समुद्रसफर घडवत होता. 12 वाजण्याच्या सुमारास एका पर्यटकाला घेऊन तो पाण्यात गेला होता. मात्र अचानक त्याची जेट स्की उलटली आणि नीलेश बुडून मरण पावला. पर्यटकाने लाईइ जॅकेट घातल्याने त्याचा जीव बचावला आहे. (वार्ताहर)