शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

शिवडे: जमिनीच्या मोजणीवेळी सापडलेल्या तीन पैकी एका पिलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 20:06 IST

ती बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. या तीनपैकी एका पिलाचा ऊन व भुकेपोटी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शैलेश कर्पे, लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर (नाशिक) : जमिनीच्या मोजणी सुरु असतांना अचानक गवतात बिबट्याच्या बछड्यासदृश पिल्ले आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. परिसरात मादी बिबट्या असेल या भीतीने सर्वांचीच पाचावर धारण बसली. बिबट्याची बछडे आढळल्याची वार्ता गावभर पसरली. भीतीयुक्त वातावरणात मात्र कुतूहलाने पिल्ले पाहण्यासाठी हवश्या-नवश्यांनी भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील शेताकडे धाव घेतली. वनविभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. निरीक्षणाअंती ती बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. या तीनपैकी एका पिलाचा ऊन व भुकेपोटी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील शिवडे शिवारात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दोन वारसांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर नित्याचाच आहे. त्यामुळे दिसून आलेली पिल्ले बछड्यांचीच असावा असा समज शेतकºयांचा झाला होता. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर ती बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले.

शिवडे शिवारात कारभारी लक्ष्मण हारक यांच्या गट नंबर ८३१ मध्ये जमिनीची मोजणी सुरु होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास गवताखाली बछड्यासारखी दिसणारी चार ते पाच दिवसांची तीन पिल्ले आढळून आली. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवडे परिसरात बछडे असल्याने या भागात मादी असावी असा समज निर्माण होऊन त्यातून दहशत निर्माण झाली.

घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे, वनक्षेत्र अधिकारी अनिल साळवे, वनपाल पंडीत आगळे, रावसाहेब सदगीर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी हजर झाले. अधिकाºयांनी पिल्लांची पाहणी केल्यानंतर ती बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर शेतकºयांचा जीव भांड्यात पडला.तीन पिल्लांपैकी एकचा मृत्यू झाला होता तर उर्वरित दोन पिल्लेही कमजोर असल्याचे दिसून आले. नाशिक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पवार यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मादी येऊन तरसाच्या पिल्लांना घेऊन जाईल असे मतप्रवाह असतांना पिल्ले मात्र जास्तच कमजोर असल्याने त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याने त्यांना मोहदरी वनउद्यानात डॉक्टरांच्या देखरेखीसाठी उपचाराला ठेवण्याचा निर्णय सायंकाळी घेण्यात आला.

शिवडे शिवारात आढळून आलेली पिल्ले ही बछडे नसून तरसाची पिल्ले आहेत. शेतकºयांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. तीन पैकी एका पिलाचा मृत्यू झाला असून दोन पिल्लांवर उपचाराची गरज आहे. त्यांच्यावर दोन दिवस उपचार केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. -प्रवीण सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर 

टॅग्स :Nashikनाशिकsinnar-acसिन्नर