शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:09 IST

कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये आयसीएमआरचं सर्वेक्षण

मुंबई: देशातील कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधील एक तृतीयांश लोकांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) व्यक्त केली आहे. एक तृतीयांश नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असावी. मात्र त्यातून ते बरे झाले असावेत, असं आयसीएमआरनं एका सर्वेक्षणात म्हटलं आहे. मात्र आयसीएमआरनं अद्याप हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुंबई, पुण्यात हॉटस्पॉटची संख्या जास्त असल्यानं आयसीएमआरचा अहवाल राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.कंटेन्मेंट झोन्स आणि हॉटस्पॉट्समधील १५ ते ३० टक्के व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. या व्यक्ती कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्या असाव्यात, असं आयसीएमआरनं अहवालात नमूद केलं आहे. ही माहिती केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. देशातील इतर भागांतील हॉटस्पॉट्सच्या तुलनेत मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूरमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण १०० पटीनं जास्त असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. आयसीएमआरनं सर्वाधिक धोका असलेल्या भागांमधील संसर्गाचं प्रमाण तपासून पाहण्यासाठी एक महत्त्वाचं सर्वेक्षण केलं. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या १० शहरांमधून नमुने घेण्यात आले. प्रत्येक शहरातल्या १० कंटेन्मेंट झोनमधून प्रत्येकी ५०० नमुने घेण्यात आले. याशिवाय २१ राज्यांमधल्या ६० जिल्ह्यांतून प्रत्येकी ४०० नुमने घेण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या जास्त, मध्यम आणि कमी असलेल्या भागांमधून नमुने गोळा करण्यात आले होते. देशातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नईमध्ये आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६५ हजारांच्या पुढे गेला आहे. सध्याच्या घडीला भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत जगात सहाव्या स्थानी आहे. भारतापेक्षा जास्त कोरोना रुग्ण अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि ब्रिटनमध्ये आहेत. …अन् ३ वर्षाच्या चिमुरडीला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन लावतात; ऑडिओ क्लीप व्हायरलमहाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या