महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:18 PM2020-06-09T12:18:15+5:302020-06-09T13:09:12+5:30

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.

Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism | महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

Next

मुंबई: कोरोना व्हायरसचं संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून प्रेरणा घ्यावी, अशा शब्दांत संरक्षणमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी निशाणा साधला होता. तसेच महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे, अशी टीका देखील राजनाथ सिंह यांनी केली होती. या टीकेनंतर ठाकरे सरकारनेही राजनाथ सिंह यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक ट्विट करत म्हणाले की,  महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने देखील (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. 

"सोनू सूद राऊतांकडे लक्ष देऊ नको; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही"

महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा टोला देखील नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांना लगावला आहे.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी सोमवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राला ‘जनसंवाद रॅलीत’ मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र सरकार हे संकट हाताळण्यास असमर्थ ठरले आहे, हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीने हे दाखवून दिले आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले होते. तसेच स्थलांतरित मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यांत घेऊन जाण्यासाठी आमच्या रेल्वे तयार होत्या. पण महाराष्ट्र सरकारने पुरेसे सहकार्य न केल्यामुळे त्यांची फरपट झाली, अशी टीका देखील राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर केली. त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी लढण्यासाठी सर्व ती मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

10 जूनपासून नवा नियम लागू; 'या' बँकेतील ग्राहकांना होणार फायदा

Web Title: Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.