निरीक्षणगृहातून पलायन केलेल्यांपैकी एक शरण
By Admin | Updated: July 28, 2015 02:22 IST2015-07-28T02:22:05+5:302015-07-28T02:22:05+5:30
निरीक्षणगृहातून पलायन केलेल्या पाचपैकी एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना शरण आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला पुन्हा सुधारगृहात दाखल केले आहे.

निरीक्षणगृहातून पलायन केलेल्यांपैकी एक शरण
अहमदनगर : निरीक्षणगृहातून पलायन केलेल्या पाचपैकी एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना शरण आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला पुन्हा सुधारगृहात दाखल केले आहे. तर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निरीक्षणगृहातील काळजीवाहक रेखा घनश्याम वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास मुला-मुलींच्या निरीक्षणगृहातून पाच अल्पवयीन मुलींनी पलायन केले होते. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तातडीने पोलीस पथके तैनात करून मुलींचा शोध घेतला. पाचपैकी चार मुलींचा सोमवारी सायंकाळपर्यंत काहीही शोध लागला नव्हता. मात्र, नगर तालुक्यातील रहिवासी असलेली एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना शरण आली आहे. ती स्वखुशीने पुन्हा पोलिसांना शरण आली, असे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)