कोर्ट शिक्षा करेल या भितीने एकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 20, 2016 19:14 IST2016-08-20T19:14:30+5:302016-08-20T19:14:30+5:30
पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामध्ये न्यायालय आपल्याल शिक्षा करेल या भितीनेच पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली

कोर्ट शिक्षा करेल या भितीने एकाची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
कुसळंब/पांगरी, दि. २० - पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामध्ये न्यायालय आपल्याल शिक्षा करेल या भितीनेच पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी सकाळी उघडकीस आली. हरी गेना गायकवाड (रा. ममदारपूर, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील हरी याने गारी वर्षापूर्वी त्याची पत्नी सुरेखा हिला विहरीत ढकलून दिल्याने तिचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता. त्या प्रकरणात त्याला जामीनही मिळाला होता. मात्र न्यायालयाच्या सुनावनीला तो घाबरून न्यायालयात हजर होत नव्हता त्यामुळे त्याच्या विरुध्द वारंट निघाले होते. त्यामुले पोलिस आपल्याला पकडून नेतील न्यायालयाचा निकाल विरोधात जाऊन आपल्याला शिक्षा होईल या भितीने त्याने आज त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पांगरी पोलिसात नोंद झाली असुन पुढील तपास पोलिसे हेड कॉन्स्टेबल शेटे करीत आहे.