इंदापूरजवळ भीषण अपघात, कृषी सभापतीसह एकजण जागीच ठार
By Admin | Updated: July 10, 2016 15:43 IST2016-07-10T15:43:44+5:302016-07-10T15:43:44+5:30
लग्नकार्यासाठी जात असताना शासकीय गाडीचा भीषण अपघात होऊन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडीत वाघ व त्यांचे मित्र सुरेश बारवे (टेंभुर्णी) हे जागीच ठार झाले.

इंदापूरजवळ भीषण अपघात, कृषी सभापतीसह एकजण जागीच ठार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १० - लग्नकार्यासाठी जात असताना शासकीय गाडीचा भीषण अपघात होऊन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडीत वाघ व त्यांचे मित्र सुरेश बारवे (टेंभुर्णी) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दरम्यान, जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती पंडीत वाघ हे आपले मित्र सुरेश बारवे हे लग्नकार्यासाठी टेंभुर्णीहुन इंदापूरकडे जात असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असलेली गाडी रोडच्या खाली जाऊन आदळली. या अपघातात पंडीत वाघ व सुरेश बारवे यांच्या डोकीस जबर मार लागला होता. या अपघातानंतर जखमी दोघांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर टेंभुर्णी व इंदापूर पोलीसांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
पंडीत वाघ हे सोलापूर जिल्हा परिषदेत कृषी सभापती म्हणून कार्यभार सांभाळत होते. बबनदादा शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य लोकांची सेवा केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांची वेगळी ओळख होती.