राहुल राजला आणखी एक धक्का, आता वकिलाची माघार
By Admin | Updated: April 6, 2016 21:28 IST2016-04-06T21:05:24+5:302016-04-06T21:28:56+5:30
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात काल गुन्हा दाखल झालेल्या राहुल राज सिंहला आज आणखी एक धक्का बसला.

राहुल राजला आणखी एक धक्का, आता वकिलाची माघार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात काल गुन्हा दाखल झालेल्या राहुल राज सिंहला आज आणखी एक धक्का बसला. राहुलचे वकिल नीरज गुप्ता यांनी खटल्यातून माघार घेतली आहे.
अशीलाने वकिलाला सर्व माहिती दिली पाहिजे. पण मला अंधारात ठेवले. मला बाहेरुन माहिती मिळाली असे नीरज गुप्ता यांनी सांगितले.
मी मानवतेच्या आधारावर या खटल्यातून माघार घेत आहे. हा खटला लढू नये असे मला वाटते. त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही असे नीरज गुप्ता यांनी सांगितले.