माणगावजवळ दोन अपघातात एक ठार
By Admin | Updated: September 20, 2016 03:26 IST2016-09-20T03:26:51+5:302016-09-20T03:26:51+5:30
मुगवली आणि कोस्ते खुर्द येथे झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात एक ठार तर १० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

माणगावजवळ दोन अपघातात एक ठार
माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी माणगांवजवळ मुगवली आणि कोस्ते खुर्द येथे झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात एक ठार तर १० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या मुगवली येथे इंडिको कार,टेम्पो व मिनीडोर रिक्षा अशा तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात रशीद युनुस शेख (रा.पोयनाड) यांचा मृत्यू झाला तर वासिम सलीम शेख ,आलम मुस्ताफर शेख (दोन्ही रा. पोयनाड), नंदा साधू पालकर (रा.जावळी, ता. माणगाव) व सुगंधा सुरेश धुवड (रा.मुगवली, माणगाव) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर माणगांव उपजिल्हा रु ग्णालयात माणगाव येथे औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. माणगाव पोलीसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार बी.एस. कदम हे करीत आहेत.
दुसरा अपघात रविवारीच संध्याकाळी सहा वाजता कोस्ते खुर्द येथे झाला. स्कार्पिओ व एसटी बस यांच्यात झालेल्या या अपघातात संजय लक्ष्मण दसवते, अरु णा लक्ष्मण दसवते, शीतल लक्ष्मण दसवते, उदय काशिनाथ मुरकर, क्र ांती काशिनाथ मुरकर व प्राजक्ता उदय मुरकर हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर माणगांव उपजिल्हा रु ग्णालयात औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहेत.
माणगाव पोलीसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक आर.के.शिरसाट हे करीत आहेत. (वार्ताहर)