गुन्ह्यात अडकवल्याच्या संशयातून पुण्यात एकाची हत्या
By Admin | Updated: June 30, 2017 12:27 IST2017-06-30T12:25:59+5:302017-06-30T12:27:02+5:30
जुन्या गुन्हयामध्ये अडकवल्याच्या संशयावरून एकाचा खून करून त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीत फेकण्यात आला.

गुन्ह्यात अडकवल्याच्या संशयातून पुण्यात एकाची हत्या
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - जुन्या गुन्हयामध्ये अडकवल्याच्या संशयावरून एकाचा खून करून त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीत फेकण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास संगमवाडी येथे घडली. खडकी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
निलेश श्रीनिवास केंची (रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय भारज चवजमहल (वय-30) रा.इंदिरानगर), नितीन सुरेश जोगदंड (वय-30, रा. दांडेकर, पूल) आणि प्रकाश बाळासाहेब ओव्हाळ (वय-22, रा.दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रत्नमाला श्रीनिवास केंची यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत व्यक्ती एकमेकांना ओळखत होते. श्रीनिवास केंची याने जुन्या गुन्ह्यात अडकवल्याच्या संशयावरून तिघांनी निलेश याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेहाचा कुणी शोध घेऊ नये यासाठी त्यांनी रिक्षातून मृतदेह नेत संगमवाडी पुलावरून तो मुळा-मुठा नदीत फेकून दिला. पोलीस निरीक्षक लकडे अधिक तपास करीत आहेत.