भाविकांच्या तंबूवर भिंत कोसळून एक ठार, दोन जखमी
By Admin | Updated: July 2, 2017 18:22 IST2017-07-02T18:22:21+5:302017-07-02T18:22:21+5:30
पंढरपूर येथील गेंडवती परिसरात मुक्कामासाठी उतरलेल्या वारकरी दिंडीच्या तंबूवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक वयोवृद्ध भाविक जागीच ठार झाला

भाविकांच्या तंबूवर भिंत कोसळून एक ठार, दोन जखमी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - पंढरपूर येथील गेंडवती परिसरात मुक्कामासाठी उतरलेल्या वारकरी दिंडीच्या तंबूवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक वयोवृद्ध भाविक जागीच ठार झाला, तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. रामकिशन माधवराव कराळे (वय 70 वर्षे) रा.पिंगळी (कोथळी) ता.,जि. परभणी असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी गेले असून जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे.
या दुर्घटनेत सुमनबाई तुकाराम कुदळे (वय 65 वर्षे) आणि मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60 वर्षे) जखमी झाल्या आहेत. दोघीही जिंतूर, जि. परभणी येथील आहेत. जखमी महिला भाविकांवर पंढरपुरातील कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत रामकिशन कराळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह त्यांच्या गावी पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.