दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, चार जखमी
By Admin | Updated: July 24, 2016 18:08 IST2016-07-24T18:08:33+5:302016-07-24T18:08:33+5:30
कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले.

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, चार जखमी
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 24 - कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले. जखमींना तातडीने नागपुर येथे रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. कारंजा पेट्रोलपंपावर डिझल भरून नागपुरकडे निघालेल्या कारला मागुन येणा-या स्कार्पिओने धडक दिली. यात कारचा समोरील भागाचे नुकसान झाले. अन्य अपघाताच्या घटनेत नागपुर येथुन अमरावती जात असतांना कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजक ओलांडुन दुस-या बाजुला पलटी झाली. कारंजा अपघातातील मृतक गौतम अजयकुमार जैन वय 30, जखमी अक्षय ऊत्तम बोरकर वय 24 व जितेंद्र अशोक बोचर वय 28 असे आहे.