पीकअप पलटल्याने एक ठार तर 5 जण जखमी
By Admin | Updated: May 4, 2017 20:29 IST2017-05-04T20:29:29+5:302017-05-04T20:29:29+5:30
येथील खेडगाव ते कोळगाव रस्त्यावर पीकअप गाडी पलटी (क्रमांक एम.एच. १९ एस ५५११) होऊन सुमनबाई शंकर पाटील

पीकअप पलटल्याने एक ठार तर 5 जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
भडगाव (जळगाव), दि. 4 - येथील खेडगाव ते कोळगाव रस्त्यावर पीकअप गाडी पलटी (क्रमांक एम.एच. १९ एस ५५११) होऊन सुमनबाई शंकर पाटील (वय ७२) रा. खेडी- खेडगाव ( ता. चाळीसगाव ) या जागीच ठार झाल्या. तर पाचजण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
अपघातात मीनाबाई शांताराम पाटील ( वय ४५), शांताराम शंकर पाटील ( वय ५०), सोनुबाई साहेबराव पाटील ( वय ४९) सर्व रा. मोढांळा ( ता.पारोळा) हे जखमी झाले आहे. जखमीवर ग्रामिण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे रवाना केले आहे. मयत वृद्धा या शिवणी ( ता. भडगाव ) येथे लग्नासाठी आलेली होती. घटनास्थळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भय्यासाहेब पाटील यांनी रूग्नवाहीका बोलवुन जखमीना दवाखान्यात हलविले. माजी आमदार दिलीप वाघ आदींनी रूग्णालयाला भेट दिली. चालक समाधान सुपडु पाटील रा. शिवणी ( ता. भडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.