एक्स्प्रेस-वेवर अपघातात एक ठार
By Admin | Updated: April 27, 2017 01:56 IST2017-04-27T01:56:53+5:302017-04-27T01:56:53+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बुधवारी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान दोन वेगवेगळे अपघात घडले.

एक्स्प्रेस-वेवर अपघातात एक ठार
वावोशी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बुधवारी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान दोन वेगवेगळे अपघात घडले. यातील एका अपघातात वाहन रस्त्यालगत बसलेल्या व्यक्तींना धडकले. यात एक अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाली.
तर दुसरा अपघात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला. जखमी ट्रकचालकास महामार्ग पोलीस व देवदूत विजय भोसले यांनी एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी एक्स्प्रेस-वेवरील दिवसाची सुरु वात पुन्हा अपघाताने झाली. (वार्ताहर)