एक किलो सोने जप्त

By Admin | Updated: November 9, 2016 05:03 IST2016-11-09T05:03:38+5:302016-11-09T05:03:38+5:30

दुबईवरून तस्करी करून पुण्यात आणलेले ३१ लाख ३५ हजार रुपये किमतीचे १ किलो सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले़ ही कारवाई पुणे

One kg gold seized | एक किलो सोने जप्त

एक किलो सोने जप्त

पुणे : दुबईवरून तस्करी करून पुण्यात आणलेले ३१ लाख ३५ हजार रुपये किमतीचे १ किलो सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले़ ही कारवाई पुणे विमानतळावर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केली.
स्पाइट जेट कंपनीचे ‘एसजी ५२’ हे विमान रविवारी पहाटे साडेचारला पुणे विमानतळावर आले. त्या वेळी त्यामध्ये तस्करीचे सोने आणल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विमानाची तपासणी केली असता, त्यांना एका काळ्या रंगाच्या सीटखाली हे सोने आढळले. केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दुबईवरून तस्करी करून आणलेले तब्बल ९ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: One kg gold seized