शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:09 IST

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे.

 डोंबिवली - मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवेश न मिळाल्याने दरवाजाला लटकून प्रवास करणा-या रविकांत भगवान चाळकर (४५) यांचा आज सकाळी धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. रविकांत चाकळर हे पलावासीटी, काटई, डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी होते.

रविकांत चाळकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल पकडण्यासाठी डोंबिवली स्थानकात आले होते.  लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना चढता आले नाही. त्यामुळे ते ते दरवाजाला लटकून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांचा तोल गेला आणि ते डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडले. हा अपघात सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली.  यासंदर्भात अधिक माहित देताना  डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, ''अपघात झाल्यानंतर सहप्रवाशांनी तातडीने चेनखेतरत लोकल थांबवली, त्यानूसार लोहमार्ग पोलिसांनी आणि त्या इसमाच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डोक्याला प्रचंड मार लागल्याने रक्तस्त्राव झाला होता. तेथे उपचार करण्यासाठी नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.''पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत इसम हे मुंबई न्यायालयात क्लार्क पदावर कार्यरत होते. या अपघातासंदर्भात मयताच्या मित्रांनीच त्यांच्या घरी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार मयातची आई, पत्नी, मुलगी असा परिवार घटनास्थळी आला होता. मयताची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. गर्दीचा बळी गेल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त झाली. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असून, डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलdombivaliडोंबिवलीAccidentअपघात