जोगेश्वरीत दुचाकी उड्डाणपूलावरुन पडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: December 14, 2015 09:42 IST2015-12-14T09:19:24+5:302015-12-14T09:42:47+5:30
पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी उड्डाणपूलावर रविवारी रात्री झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर, दोघेजण गंभीर जखमी झाले.

जोगेश्वरीत दुचाकी उड्डाणपूलावरुन पडून एकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी उड्डाणपूलावर रविवारी रात्री झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. एकाच दुचाकीवर स्वार होऊन हे तीन तरुण उड्डाणपूलावरुन जात होते.
दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपूलावरुन थेट खाली पडली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तिघांना लगेचच नजीकच्या रुग्णालयात नेले.