वीज कोसळून एकाचा मृत्यू, एक गंभीर
By Admin | Updated: April 8, 2016 02:05 IST2016-04-08T02:05:34+5:302016-04-08T02:05:34+5:30
१६ वर्षीय मुलाचा मृत्यू, तर अन्य एक जण गंभीर; देऊळगाव राजा येथील घटना.

वीज कोसळून एकाचा मृत्यू, एक गंभीर
देऊळगावराजा (बुलडाणा) : देऊळगावराजा तालुक्यातील खंदारेवाडी येथे वीज कोसळून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, तर अन्य एक जण गंभीर झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. खंदारेवाडी येथील पाचव्या वर्गात शिकणारा विकास माणिकराव खंदारे (१६ वर्षे) आणि जगन गंगाराम मनोतकर (३0 वर्ष) हे शेळ्या-मेंढय़ाना चारण्यासाठी गुरूवारी सकाळी शिवारात गेले होते. घरी परतताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचाकन विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी विकासच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. जगन गंगाराम मनोतकर हा या घटनेत गंभीर जखमी झाला. त्याला जालना येथे हलविण्यात आले आहे. दुसर्या एका घटनेत सायंकाळी ५.३0 वाजेच्या सुमारास इस्लामवाडी येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला.