सिरोंचाजवळ गोदावरी नदीत बोट बुडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: February 22, 2016 02:16 IST2016-02-22T02:16:04+5:302016-02-22T02:16:04+5:30
सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात रविवारी गोदावरी नदीत बोट बुडाली. त्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण बेपत्ता आहेत.

सिरोंचाजवळ गोदावरी नदीत बोट बुडून एकाचा मृत्यू
सिरोंचा (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात रविवारी गोदावरी नदीत बोट बुडाली. त्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण बेपत्ता आहेत.
या बोटीत २२ प्रवासी व तीन दुचाकी होत्या. १६ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. तेलंगण राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नदीचा प्रवाहमार्ग वळविण्याचे काम सुरू होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्ट्रिमर बोटीची व्यवस्था करण्यात आली.
सिरोंचाकडील काठाकडून तेलंगण राज्यातील कालेश्वरजवळील कन्नेपल्ली गावाच्या दिशेने जात असताना नदीपात्राच्या प्रवाहात सापडून बोटीचा मार्ग बदलला व कच्चा रस्ता बनविलेल्या पुलाला आदळून ती उलटली. आसपासच्या लोकांनी बोटीतील १६ जणांना वाचविले. (प्रतिनिधी)