विमानतळावर उपचाराअभावी एकाचा मृत्यू
By Admin | Updated: May 25, 2014 05:43 IST2014-05-25T05:43:05+5:302014-05-25T05:43:05+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या पुणे विमानतळावर अचानक प्रवाशाचे किंवा कर्मचार्याची तब्येत बिघडल्यास प्राथमिक आरोग्य सुविधाही उपलब्ध नाही

विमानतळावर उपचाराअभावी एकाचा मृत्यू
पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या पुणे विमानतळावर अचानक प्रवाशाचे किंवा कर्मचार्याची तब्येत बिघडल्यास प्राथमिक आरोग्य सुविधाही उपलब्ध नाही. त्यामुळे बुधवारी एक जणाला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातही एका विमानतळावरील कर्मचार्याला त्वरीत उपचार सुविधा न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पुणे आंतरराष्टÑीयस्तरावर आयटी व ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेले आहे. त्यामुळे परदेशातून अनेक जण पुण्यातला भेट देतात. पुणे विमानतळावर दररोज ५० पेक्षा जास्त विमानांच्या फेर्या होतात. तसेच हजारो प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा विमानतळावर असणे आवश्यक आहे. या सुविधा नसल्यामुळे बुधवारी लक्ष्मण नाटेकर या एअरपोर्ट वृत्तपत्र विक्रेत्याला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी सकाळी ६. १० वाजता ते एअरपोर्ट मध्ये असणारे त्यांचे वृत्तपत्र व पुस्तकांचे दुकान उघडत होते. तेव्हा दुकान उघडल्यानंतर अचानक ते कोसळले. तेव्हा एअरपोर्टवर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा व अॅम्बुलन्सही नव्हते. तसेच त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी एअरपोर्टवर ७.२५ वाजता गाडी मागविण्यात आली. तेथून त्यांना ससून रूग्णालयात नेण्यात आले. रूग्णालयात त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. कर्मचार्याचाही गेला प्राण दरम्यान, ४ एप्रिल २०१४ रोजी स्पाईस जेटच्या पद्मनाभन या कर्मचार्याला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यालाही उपचार उपलब्ध झाले नव्हते.