तरुणीला वाचवताना भुसावळात एकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 29, 2016 23:45 IST2016-07-29T23:45:18+5:302016-07-29T23:45:18+5:30

विहिरीत उडी घेतल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराचा मृत्यू झाला.

One of the dead in the underworld while saving the woman | तरुणीला वाचवताना भुसावळात एकाचा मृत्यू

तरुणीला वाचवताना भुसावळात एकाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 29 - शहरातील खडका रोड, ग्रीन पार्क भागातील वेडसर तरुणीने विहिरीत उडी घेतल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराचा मृत्यू झाला. वेडसर तरुणीचे मात्र प्राण वाचले़ ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली़
शेख अजीज शेख याकुब (वय ४८, रा़मुस्लीम कॉलनी, भुसावळ) असे मयत ठेकेदाराचे नाव आहे़
ग्रीन पार्क भागातील एका पडक्या विहिरीत १८ ते २० वर्षीय वेडसर तरुणीने उडी घेतली. या तरुणीला वाचवण्यासाठी अजीज ठेकेदार यांनी उडी घेतली़ त्यांनी साहस दाखवत तरुणीला बाहेर काढले मात्र कठड्यावर आल्यानंतर त्यांचा पाय सरकून तोल गेल्याने विहिरीच्या गाळात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी शेख अजीज यांना शहरातील डॉ़राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले़ डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. ही घटना या भागात कळताच घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी झाली.
पोलिसांची धाव
घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे, माणिक सपकाळे, संजय पाटील, प्रशांत चव्हाण, राजेंद्र तोडकर, प्रशांत जावरे, दिनेश कापडणे आदींनी घटनास्थळी धाव घेत गर्दी नियंत्रित केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची बाजारपेठ पोलिसात नोंद झालेली नव्हती.

Web Title: One of the dead in the underworld while saving the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.