एक कोटी मतदार, 36 आमदार

By Admin | Updated: October 11, 2014 22:54 IST2014-10-11T22:54:23+5:302014-10-11T22:54:23+5:30

्रविधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी कोटय़वधींची संपत्ती जाहीर केली असताना मुंबईतील मतदारांच्या संख्येनेही कोटींचा आकडा पार केला आहे.

One crore voters, 36 MLAs | एक कोटी मतदार, 36 आमदार

एक कोटी मतदार, 36 आमदार

>तीन लाख नव्या मतदारांची भर : 521 उमेदवार आजमावणार नशीब
चेतन ननावरे- मुंबई
्रविधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी कोटय़वधींची संपत्ती जाहीर केली असताना मुंबईतील मतदारांच्या संख्येनेही कोटींचा आकडा पार केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदार नोंदणीत मुंबईतील 36 मतदारसंघांत 3 लाख 2 हजार 369 नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांची संख्या 1 कोटी 1 लाख 99 हजार 389 इतकी झाली आहे. या विधानसभा निवडणूकीत 36 मतदारसंघात 521 उमेदवार नशिब आजमावणार आहेत.
मुंबईतील मतदारांची संख्या आता 1 कोटी 1 लाख 99 हजार 389 इतकी झाली आहे. मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर अशा सहा लोकसभा मतदारसंघांत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 5क् हजार मतदारांची भर पडलेय. बोरीवली, दहिसर, मागाठाणो, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्चिम) या विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक मतदारांची भर पडली आहे. 
उत्तर मुंबईत एकूण 61 हजार 95क् नवे मतदार सामील झाले आहेत. तर इतर पाच मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी नोंदणी उत्तर पश्चिम मुंबईतून झाली आहे. या ठिकाणी असलेल्या जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघांतून एकूण 42 हजार 95 इतकी मतदार नोंदणी झाली आहे. 
 
मुंबई उत्तर
मतदारसंघलोकसभा विधानसभा
बोरीवली3,14,1473,27,866 
दहिसर3,क्6,5433,16,643 
मागाठाणो3,क्3,2क्93,क्7,733 
कांदीवली2,62,3832,73,3क्4 
चारकोप3,क्7,25क्3,16,882 
मालाड (प.)2,9क्,क्38    3,क्3,क्92 
 
उत्तर पूर्व
मतदारसंघलोकसभा विधानसभा
मुलूंड2,89,7542,98,247विक्रोळी2,49,6722,54,825
भांडुप प.2,92,3692,98,5क्3
घाटकोपर प.2,93,7373,क्3,168
घाटकोपर पू.2,42,2462,48,394
मान. शि. नगर 3,क्क्,4933,क्9,421
 
मुंबई दक्षिण
मतदारसंघलोकसभा विधानसभा
कुलाबा2,44,3क्42,53,716
मुंबादेवी22928क्2,37,75क्
मलबार हिल26981क्2,77,772
भायखळा22क्क्462,27,क्92
शिवडी2655542,73,416
वरळी2563582,65,क्85
 
नव्या मतदारांचा फायदा कोणाला? 
सुमारे 3 लाख नव्या मतदारांचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत निश्चितता नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तरुणांत क्रेझ आहे. तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही तरुणांना आकर्षण आहे. 
 
शिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ चारित्र्याबाबतही तरुणांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे नेमकी ही मते कोणत्या पक्षाला मिळणार, हे 19 ऑक्टोबर रोजी होणा:या मतदानाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. 
 
उत्तर पश्चिम
मतदारसंघलोकसभा विधानसभा
जोगेश्वरी2,81,1792,89,8क्9
दिंडोशी2,89,6722,95,8क्5
गोरेगाव3,3क्,2343,37,7क्क्
वर्सोवा2,9क्,6822,98,क्31
अंधेरी प.3,क्3,973 3,क्9,777
अंधेरी पूर्व2,79,4472,86,16क्
 
उत्तर मध्य
मतदारसंघलोकसभा विधानसभा
विलेपार्ले2,77,1262,86,16क्
चांदिवली4,क्5,8क्84,17,71क्
कुर्ला2,83,1772,9क्,484
कलिना2,48,2क्22,52,999
वांद्रे पूर्व2,58,8122,63,79क्
वांद्रे पश्चिम2,65,5352,86,531
 
दक्षिण मध्य
मतदारसंघलोकसभा विधानसभा
माहीम2,66,4192,32,643
वडाळा1,89,49क्1,96,9क्5
शी. कोळीवाडा2,46,क्क्82,54,145
धारावी2,33,1482,39,क्59
चेंबूर2,73,56क्2,79,575
अणुशक्तीनगर2,78,3552 ,89,197
 

Web Title: One crore voters, 36 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.