दुबईरिटर्न महिलेकडून एक कोटीचे सोने जप्त
By Admin | Updated: November 30, 2014 00:17 IST2014-11-30T00:17:36+5:302014-11-30T00:17:36+5:30
दुबईहून सोने तस्करी करून विमानाने पुण्यात आलेल्या महिलेस सीमाशुल्क विभागाने पकडले असून, तिच्याकडून 1 कोटी 6 लाख 88 हजार 160 रुपयांचे 4 किलो सोने जप्त केले आह़े

दुबईरिटर्न महिलेकडून एक कोटीचे सोने जप्त
पुणो : दुबईहून सोने तस्करी करून विमानाने पुण्यात आलेल्या महिलेस सीमाशुल्क विभागाने पकडले असून, तिच्याकडून 1 कोटी 6 लाख 88 हजार 160 रुपयांचे 4 किलो सोने जप्त केले आह़े अगवान आस्माँ (रा़ जोगेश्वरी (प़), मुंबई) असे तिचे नाव आह़े अगवान ही आज पहाटे दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानाने पुणो येथील लोहगाव विमानतळावर आली़ अगवान हिने आपल्याकडे शुल्क आकारणी होऊ शकेल, अशी कोणतीही वस्तू नसल्याचे जाहीर करून ग्रीन चॅनेलमधून ती घाईघाईने चालत जाऊ लागली़ या वेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिका:यांना तिचा संशय आला़ त्यांनी तिची झडती घेतल्यावर तिच्या अंतर्वस्त्रंमध्ये सोन्याचे 8 बार आढळून आल़े तिच्याविरुद्ध सीमाशुल्क अॅक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तिच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. सीमाशुल्क विभागाचे आयुक्त क़े राजेश रामा राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)