शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचविणार; मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:07 IST

मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय.

ठाणे - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वितेसाठी, महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील, मी आजपासून त्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक रोज १५ घरांपर्यंत अशा पद्धतीने एक कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही, याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला. 

‘लेक लाडकी लक्ष्मी’, ‘मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना’, ‘मुलींचे उच्च शिक्षण मोफत’, ‘शेतकऱ्यांचे विज बिल माफ’ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी झाले. ही योजना पाच कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली. एक कोटी ६० लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील. कुटुंबाच्या इतर अडचणी सोडवतील. आठवडाभरात एक कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय.

आमच्या सरकारला किती गुण देणार? 

मुख्यमंत्र्यांनी शहरातील १५ घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे तुम्हाला वाटते का? आमच्या सरकारने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्या.  या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहोत. तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या. आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना विचारला. यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार, असे या महिला उत्तरल्या.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा