विकासकामांची माहिती मिळणार एका क्लिकवर

By Admin | Updated: April 30, 2016 01:33 IST2016-04-30T01:33:45+5:302016-04-30T01:33:45+5:30

गेल्या ५ वर्षात कोणती विकासकामे राबविली याचा लेखाजोखा महापालिकेच्या संकेतस्थळावर मांडण्यात आला आहे.

One click will get information about development works | विकासकामांची माहिती मिळणार एका क्लिकवर

विकासकामांची माहिती मिळणार एका क्लिकवर

पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील प्रभागांमध्ये गेल्या ५ वर्षात कोणती विकासकामे राबविली याचा लेखाजोखा महापालिकेच्या संकेतस्थळावर मांडण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी गेल्या ५ वर्षात काय कामे केली याची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच येत्या १५ दिवसांमध्ये या विकासकामांवर नागरिकांना आपली मतेही नोंदविता येणार आहेत.
नगरसेवक तसेच पालिका प्रशासनाच्यावतीने अनेक प्रकारची विकासकामे प्रभागात केली जातात. पालिकेच्या भवन, क्षेत्रीय कार्यालये , आयोग्य विभाग, घनकचरा, बांधकाम विभागांमार्फत ही कामे केली जातात. त्याची सविस्तर माहिती वर्षनिहाय देण्यात आली आहे. त्या कामाचे स्वरूप काय आहे, त्याला किती खर्च आला आहे. निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली, कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली काम झाले आदी माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यावर आपली मते नोंदविता येणार आहे. या कामाची आवश्यकता होती का, काम योग्य पद्धतीने झाले
आहे का याबाबतची मते त्यांना मांडता येणार आहेत.

Web Title: One click will get information about development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.