असं धाडस फक्त बाळासाहेबांचे नातूचं करु शकतात - जितेंद्र आव्हाड
By Admin | Updated: October 16, 2016 13:09 IST2016-10-16T11:26:00+5:302016-10-16T13:09:50+5:30
आपल्या सरकारला व शिवसेनेच्या सरकारला नालायक म्हणायच धाडसं फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अदित्यचं दाखवू शकतात.

असं धाडस फक्त बाळासाहेबांचे नातूचं करु शकतात - जितेंद्र आव्हाड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - आपल्या सरकारला व शिवसेनेच्या सरकारला नालायक म्हणायच धाडसं फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अदित्यचं दाखवू शकतात. या बद्दल त्यांचे अभिनंदन असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या व आताच्या सरकारमध्ये काहीही बदल असल्यासारखे वाटत नाही, असा टोला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युती सरकारला लगावला होता.
‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या गोंधळाविरुद्ध सरकारला आणि शिक्षण खात्याला जाग आणण्यासाठी अदित्य ठाकरे यांच्या नेत-त्वाखाली युवासेनेने मोर्चाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी विनोद तावडे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, शैक्षणिक सुधारणेसाठी अनेकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्याबाबत आतापर्यंत आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आता मागण्यांनाही ‘एटीकेटी’ लागली की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. अदित्य ठाकरेयांच्या या विधानाला धरुन आव्हाड यांनी भाजपा-शिवसेनाला टार्गेट करत त्यांच्यावर टीका केली.
स्वताच्या सरकारला व त्या मधील @ShivSena मंत्र्यांना नालायक म्हणायचे धाडस फक्त बाळासाहेबांचे नातू @AdityaThackeray दाखवू शकतात congrats https://t.co/ZBWLsHbnkD
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 15, 2016