वाळू व्यवसायातून एकावर हल्ला
By Admin | Updated: May 10, 2017 02:33 IST2017-05-10T02:33:13+5:302017-05-10T02:33:13+5:30
वाळू व्यवसायातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारात मंगळवारी दुपारी घडली.

वाळू व्यवसायातून एकावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) : वाळू व्यवसायातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारात मंगळवारी दुपारी घडली. रामभाऊ गायकवाड असे हल्ला झालेल्याचे नाव असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आाहेत. पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून वाळू व पैशाच्या कारणावरून एकमेकांवर हल्ले होत आहेत. घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाल्याने त्यांची माहिती मिळू शकली नाही.