शस्त्रसाठ्यासह एकाला अटक

By Admin | Updated: November 18, 2014 02:58 IST2014-11-18T02:58:49+5:302014-11-18T02:58:49+5:30

मध्य रेल्वेमार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनसवर कुर्ला रेल्वे पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह एका आरोपीला अटक केली आहे.

One arrested with arms and ammunition | शस्त्रसाठ्यासह एकाला अटक

शस्त्रसाठ्यासह एकाला अटक

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनसवर कुर्ला रेल्वे पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडे पोलिसांना १ रिव्हॉल्व्हर, १८ काडतुसे आणिं २ मॅगझीन असा शस्त्रसाठा आढळून आला आहे. शिवाय त्याच्याकडील मोबाइलमध्ये अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम याचे फोटो मिळाले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ११ वाजता सुटणाऱ्या गोदान एक्स्प्रेसने एक सराईत आरोपी जाणार असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळपासूनच पोलिसांनी टर्मिंनस परिसतात सापळा रचला होता.
साडेदहाच्या सुमारास फैयाज खान हा संशयित आरोपी टर्मिंनस परिसरात आला. पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता, बॅगांमध्ये १ रिव्हॉल्व्हर, १८ जिवंत काडतुसे आणि २ मॅगझीन आढळून आले.
पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेऊन तपासणी केली असता मोबाइलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीम याचे काही फोटो आढळून आले. हे फोटो पाहताच पोलिसांची तारांबळ उडाली. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे या आरोपीचे दाउदसोबत कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested with arms and ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.