गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक
By Admin | Updated: July 24, 2016 17:51 IST2016-07-24T17:51:21+5:302016-07-24T17:51:21+5:30
गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक
ऑनलाइन लोकमत
आळेफाटा, दि. 24 - जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक परिसरात एका अविवाहित गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर वामन भुतांबरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सुभाष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२२) रोजी बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडी येथे सायंकाळी साडेचारच्या वेळेला वीस वर्षीय गतिमंद तरुणीवर राहत्या घरात तेथीलच चंद्रशेखर भुतांबरे हा अत्याचार करत असल्याचे या तरुणीच्या आई व भावाने पाहिल्यावर तो पळून गेला. यानंतर पीडित तरुणीच्या भावाने आळेफाटा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने व पोलीस मित्र यांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर पहाटेच्या सुमारास त्याला जुन्नरजवळील आमलेवाडी येथून अटक केली. पीडित तरुणीच्या भावाचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.