तीन पर्यटनस्थळांना दीड कोटीचा निधी
By Admin | Updated: September 27, 2015 01:04 IST2015-09-27T01:04:20+5:302015-09-27T01:04:20+5:30
जागतिक पर्याटन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रातील तीन पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत तब्बल

तीन पर्यटनस्थळांना दीड कोटीचा निधी
पुणे : जागतिक पर्याटन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रातील तीन पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत तब्बल १ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. वन क्षेत्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्या शासनाने प्रथमच जिल्ह्यासाठी असा निधी दिला आहे.
राज्यशासनाने धार्मिक स्थळांच्या विकासासह गेल्या काही वर्षांपासून पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विविध योजना सुरूकेल्या आहेत. यामध्ये इको टुरिझम योजनेंतर्गत वेगवेगळ्या वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे भोलावडे येथे बालोद्यान, बोपगाव येथील कानिफनाथ देवस्थान व सासवड येथील मौजे वाघ डोंगर यांच्या विकासासाठी एकूण १ काटी २१ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून निसर्ग पिरक्रमा पथ, हिरवळ, चेनलिंक कुंपण, कचरा कुंडी, बालोद्यानासाठी खेळणी, प्राण्यांचे मॉडेल, सिंचन व्यवस्था, बाकडी खरेदी, सौर दिवे खरेदी, पाणवठे तयार करणे, झाडांना ओटे बांधणे, फायबर शौचालय युनिट खरेदी करणे आदी विविध कामे करणार आहेत. विकासकामे करताना बांधण्यात येणारी पॅगोडा, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, पर्यटकांना बसण्यासाठी बाक, लोखंडी साहित्य एवढी निसर्गपूरक असलेल्या साहित्यातून बांबूचा जास्तीतजास्त वापर करावा, याकडे लक्ष देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)