शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

पदवीधर मतदारांची नोंदणी जेमतेम दीड टक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:00 PM

मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदारांची नावे यादीत नाही.

ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढवा : मतदार नोंदणी सुलभ करण्याची मागणीराज्यात झालेल्या २०१४च्या पदवीधर निवडणुकीत ५ लाख ९१ हजार ९५३ मतदारांची नोंदणीभर पगारी सुट्टी द्यावी 

पुणे : पदवीधर मतदानाची नोंदणी घेण्याची मोहीम हाती घेऊनही आत्तापर्यंत शिक्षितांच्या तुलनेत जेमतेम दीड टक्के मतदारांची नोंदणी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदारांची नावे यादीत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकही मतदार नोंदणी प्रक्रियेतून सुटता कामा नये. त्यामुळे मतदारनोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी प्रजासत्ताक भारत पक्षाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. राज्यात झालेल्या २०१४च्या पदवीधर निवडणुकीत ५ लाख ९१ हजार ९५३ मतदारांची नोंदणी होती. शिक्षित लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३ टक्के मतदारांची नोंदणीच झाली आहे. त्यातील २५ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. शिक्षित मतदारांशी तुलना केल्यास १.२ टक्के मतदारांनीच मतदान केले. पुणे पदवीधर मतदारसंघामधे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हे येतात. येथील शिक्षित मतदारांची संख्या १ कोटी ९४ लाख ९० हजार ४७२ आहे. त्यातील दहा टक्के लोकसंख्याच पदवीधर असल्याचे ग्राह्य धरल्यास किमान १९ लाख ४९ हजार ४४ मतदार असतील. माध्यमांमधून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३ लाख १३ हजार ८८९ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुळातच पदवीधर मतदारांची नोंदणीच अत्यल्प होते. त्यातील एक चतुर्थांश मतदार देखील मतदानाचा हक्क बजावत नाही. सोमवार ते शनिवार या कार्यालयीन वेळेत मतदार नोंदणी केली जाते. पदवीधर देखील याच काळात आपल्या कार्यालयीन कामात असतात. त्यामुळे रविवारसोडून इतर दिवशी त्यांना नोंदणीसाठी वेळ मिळत नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी केल्यानंतर मतदाराला पुन्हा बोलावता कामा नये, अशी मागणी प्रजासत्ताक भारत पक्षाचे संस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी पुणे विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे. --भर पगारी सुट्टी द्यावी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका देखील महत्त्वाच्या असतात. मात्र, या निवडणुकीसाठी केवळ चार तासांची सुट्टी असते. या मतदारसंघाची कक्षा पाच जिल्ह्यांची आहेत. पदवीधर रोजगारासाठी विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यांना लोकसभा-विधानसभा निवडणुकी प्रमाणे संपूर्ण दिवस भरपगारी सुट्टी दिली पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील १३५-बी तरतुदीनुसार लेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीच भरपगारी रजा देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जाते. यात बदल करण्याची मागणी भारत पक्षाचे संस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी केली आहे. 

जिल्हानिहाय शिक्षितांचे प्रमाणजिल्हा                      शिक्षितांची संख्या        २०१९ पदवीधर नोंदणीपुणे                            ८२,२०,३०८                           ५८,२६२सांगली                    २२,९८,२०४                           ७९,४९६सातारा                    २४,८७,०९७                           ५३,२१८कोल्हापूर                ३१,५९,३२८                           ८४,१४८सोलापूर                  ३३,२५,५३५                          ३८,७४५

  

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार