नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा पदवीपूर्व (नीट-यूजी) निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार याने प्रथम तर मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. कृष्णांग जोशी हा महाराष्ट्रातून अव्वल ठरला असून त्याने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आयोजित केलेली नीट-यूजी परीक्षा २२.९ लाख उमेदवारांनी दिली होती. यापैकी १२.३६ लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा नीट-यूजी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कमी आहे. यंदाच्या परीक्षेत महेश कुमार याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. दुसरा क्रमांक पटकावलेल्या उत्कर्षला ६८२ तर तिसरा क्रमांक मिळवलेल्या महाराष्ट्रातील कृष्णांग जोशीला ७२० पैकी ६८१ गुण मिळाले आहेत. पास झालेल्यांमध्ये ७.२ लाखांहून अधिक महिला तर ५.१४ लाखांहून पुरुष उमेदवार आहेत.
अव्वल १० विद्यार्थ्यांची यादी१) महेश कुमार-राजस्थान२) उत्कर्ष अवधिया-मध्य प्रदेश३) कृष्णांग जोशी - महाराष्ट्र४) मृणाल किशोर झा- दिल्ली५) अविका अग्रवाल- दिल्ली६) जेनिल भयानी- गुजरात७) केशव मित्तल-पंजाब८) झा भव्य चिराग-गुजरात ९) हर्ष केदावत- दिल्ली१०) आरव अग्रवाल- महाराष्ट्र
७३ उमेदवारांना ६५१ ते ६८६ गुणनीट-यूजी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ७३ उमेदवारांनी ७२० पैकी ६५१ ते ६८६ यादरम्यान गुण मिळवले आहेत. १,२५९ उमेदवारांना या परीक्षेत ६०१ ते ६५० गुण मिळाले आहेत.
मुलींमध्ये दिल्लीची अविका अव्वलनीट-यूजी परीक्षेत मुलींमध्ये दिल्लीच्या अविका अग्रवाल हिने प्रथम तर राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिला या परीक्षेत ७२० पैकी ६८० गुण मिळाले आहेत. ५२९ परदेशी उमेदवार नीट उत्तीर्ण : या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ५२९ परदेशी तर ४०५ अनिवासी भारतीय उमदेवारांचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेत ६०६ ओसीआय कार्डधारक उमेदवारांचा समावेश आहे.