शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात ‘वर्षा’वर दीड तास चर्चा; राजकीय भोंग्यावर रणनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 08:46 IST

भोंग्यावरुन राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे होत असलेली बहुचर्चित सभा, हनुमान चालीसा, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यामुळे वातावरण तापले आहे

मुंबई : भोंगा प्रकरणावरुन सामाजिक, राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. बंद दरवाज्याआड सुमारे दीड तास दोन नेत्यांमध्ये खलबते झाली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील अधिकृतरित्या हाती आला नसला तरी, एकूणच ‘भोंगा’ हाच विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून महाविकास आघाडीचे सरकारच बरखास्त करण्याची चाल खेळली जात असून ती हाणून पाडण्यासाठी कशी रणनिती आखायची, यावरच चर्चेचा रोख होता, असे सूत्रांनी सांगितले.  

काेणता कानमंत्र दिला?भोंग्यावरुन राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे होत असलेली बहुचर्चित सभा, हनुमान चालीसा, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यामुळे वातावरण तापले आहे. हीच संधी साधत दंगाधोपा घडवून कायदासुव्यस्था बिघडल्याचा ठपका ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याचा डाव असल्याची खात्रीशीर माहिती संबंधित यंत्रणांकडून पवार यांच्या हाती आली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी भेटीत उद्धव यांना कानमंत्र दिला आहे. 

सांगितले अनुभवाचे बोलही...आमदार, खासदार, कार्यकर्ते यांनी भाजप मनसेला जशास तसे उत्तर दिले तरी सत्ताधीशांची नेमकी चाल कशी असावी, त्यादृष्टीने कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे, याबाबत अनुभवाचे बोलही पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची रणनिती कशी असावी आणि प्रत्यक्ष सत्तेतील मंडळींनी ‘सामना’ करताना काय पथ्य पाळावे, याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्यादृष्टीने ‘व्होट बॅंके’ला धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी घेत हे प्रश्न हाताळताना होणारी कसरत आणि दमझाक याचीही जाणीव पवार यांनी करून दिल्याचे समजते.

‘रान’ उठल्याची खात्रीराज ठाकरेंच्या भोंगा सभांमुळे वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राज ठाकरेंनी पाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यातील उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून मांडलेल्या भूमिकेमुळे ‘रान’ उठले आहे, याबाबत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन त्याबाबतची खात्री पक्की झाल्यानंतरच शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे एका जबाबदार नेत्याने सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे