शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
3
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
4
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
7
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
8
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
9
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
10
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
12
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
13
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
14
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
15
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
16
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
17
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
18
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
19
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
20
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले

ऐन वेळी संस्था तयार, लक्षावधींची देयकेही अदा! नियमबाह्य असतानाही ‘सोलास’वर उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 5:52 AM

‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा’च्या प्रकल्प संचालकपदी असताना गणेश चौधरी यांनी आवश्यकतेनुसार संस्था तयार करून मोठ्या रकमांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे.

- गणेश देशमुखमुंबई : ‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा’च्या प्रकल्प संचालकपदी असताना गणेश चौधरी यांनी आवश्यकतेनुसार संस्था तयार करून मोठ्या रकमांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे.जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन चमू (डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंट टीम-डीपीएमटी) आणि कार्यान्वयीन संस्था (इम्पलिमेंटिंग एजन्सी-आयए) यांनी पशुसंवर्धन व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसंबंधी प्रशिक्षणे आणि इतर कार्यासाठी सोलास या संस्थेची निवड केली. विशेष म्हणजे, सोलास संस्थेची स्थापना १७ आॅगस्ट २०१७ रोजी करण्यात आली आणि तात्काळ कामेही बहाल करण्यात आले. नियमानुसार अनुभवी आणि मापदंडांत काटेकोर उतरणाऱ्या संस्थेलाच हे काम देणे बंधनकारक होते. हा नियम धाब्यावर बसवून ऐनवेळी संस्था तयार करून रकमेचा अपहार करण्याचे कौशल्य गणेश चौधरी यांच्या कार्यळात वापरले गेले.बार्शीटाकळी (अकोला) क्लस्टरच्या पशुसंवर्धन व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी निविदा मागविल्या. त्यानुसार ह्यसोलास अ‍ॅनिमल हजबंडरी अ‍ॅक्टिव्हिटीज फॉर रुरल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडह्ण, लोकहितैशी बहुद्देशीय संस्था, अंडुरा आणि अमृता सेवा प्रतिष्ठान कळंबी (महागाव) या तीन संस्थांनी अर्ज केले. सर्वाधिक कमी दर असल्याचे कारण नमूद करून सोलास या संस्थेला प्रशिक्षणाचे काम दिले गेले. वस्तुत: पशुधन व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सोलस ही संस्था अपात्र ठरते. तरीही १७ जानेवारी २०१७ रोजी काही लक्ष रुपयांचे देयक अदा करण्यात आले.पुण्याच्या एलडीओची संस्था‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सोलास या संस्थेत राज्य शासनाच्या पशुधन विकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले यशवंतवाघमारे हे संचालक आहेत. वाघमारे हे शासकीय नोकरीत असताना अनेकदा सोलासच्या कामासंबंधाने विदर्भात आले. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. वाघमारे यांना अशा पद्धतीने काम करण्याची शासनाने परवानगी दिली होती काय? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.चौधरींची पत्नी संचालकज्या सोलास संस्थेला नियमबाह्य कामे देऊन अपहार करण्यात आला, त्या संस्थेचा स्वागत उद्योग या संस्थेशी सामंजस्य करार आहे.स्वागत उद्योग या संस्थेत गणेश चौधरी यांच्या पत्नी संचालक आहेत. अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या या क्लृप्तीचाही गंभीरपणे तपास केला जाणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र