शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त, पुन्हा एकदा हालचालींनी धरला वेग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 07:48 IST

घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला. 

मुंबई : राज्यातील महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्र उत्सव काळात होईल, असा अंदाज आहे. त्यासाठी हालचालींनादेखील पुन्हा एकदा वेग आला आहे. घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला. 

गणेशोत्सवाच्या काळात विस्तार होईल, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. मात्र, तो मुहूर्त चुकला होता. आता पुन्हा १५ किंवा १६ ऑक्टोबरला विस्तार होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटले होते. त्यावेळी श्रेष्ठींनी विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला, असे म्हटले जाते. विस्तारासंदर्भात राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची  चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फेरबदलाचीही शक्यता?मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच काही फेरबदल होण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे. हा फेरबदल केवळ खात्यांचा असेल की काही मंत्र्यांना वगळले जाईल, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

आणखी १४ मंत्र्यांच्या समावेशाची शक्यताराज्य मंत्रिमंडळात सध्या २९ मंत्री कॅबिनेट आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे यांच्या शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत, एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी चार राज्यमंत्र्यांसह १४ जणांचा समावेश होऊ शकतो.

काेणाला हवी किती मंत्रिपदे?भाजपला आठ मंत्रिपदे हवी आहेत आणि दोन मित्रपक्षांनी सहा मंत्रिपदे घ्यावीत, असा भाजपचा आग्रह आहे. मात्र, दोन्ही मित्रपक्षांना प्रत्येकी किमान चार मंत्रिपदे हवी आहेत. 

विस्तार लवकरच हाेणारराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, यासंदर्भातील चर्चा सुरू आहेत.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

९ मंत्र्यांची होणार हकालपट्टी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेनंतर ज्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, असे ९ मंत्री मंत्रिमंडळात नसतील, त्यांच्या जागेवर नवीन चेहरे दिसतील.     - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार