कांदा करणार वांदा
By Admin | Updated: July 10, 2014 22:55 IST2014-07-10T22:55:03+5:302014-07-10T22:55:03+5:30
दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निश्चित महागणार आहे.

कांदा करणार वांदा
टाकळी हाजी : दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निश्चित महागणार आहे. सध्या 25 ते 3क् रुपये किलोने विकला जाणारा कांदा ऑगस्टर्पयत 5क् ते 6क् रुपयांर्पयत जाणार, असे भाकित शेतकरी व व्यापारी व्यक्तकरीत आहेत.
कांद्याच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच कांद्याचे किमान निर्यातमूल्य तीनशे डॉलरवरून पाचशे डॉलर केले. त्यामळे निर्यातीचे प्रमाण घटेल व कांद्याचे भाव कमी होतील, असे वाटत असले, तरी कमी उत्पादनामुळे कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता कमीच आहे. कांदा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, सध्या देशाच्या पश्चिम भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामळे कांद्याची रब्बी हंगामासाठी पावसाळी रोपे तयार केलेले नाहीत. कांद्याचे पावसाळी हंगामातील उत्पादन नाही. यामुळे महत्त्वाच्या बाजारपेठात अगदी दीड ते दोन हजार क्विंटलर्पयत कांद्याची आवक होत आहे. आवक मंदावल्यामुळे व मागणी वाढल्यामुळे भाव वाढत आहेत.(वार्ताहर)
कांदा धोरण
4शिरूर तालुक्यातील कुकडी व घोड धरण लाभक्षेत्रतील शेतकरी सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेत असल्याने व कांद्याच्या भावाचा अंदाज घेऊन ते विक्री करीत असल्याने या वर्षी कांद्याचे विक्रमी पीक झाले आहे. तरी हवामानातील बदलांमुळे बराचसा कांदा खराब झाला आहे.
4केंद्र सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकल्याने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. मात्र, कांद्याचे भाव वाढते राहात असल्याने शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ‘शेतकरी सुखी, तर देश सुखी,’ अशीच प्रतिक्रिया सगळीकडे व्यक्त होत आहे.
कांदा स्वस्तात मिळण्यासाठी व्यापारी सगळीकडेच प्रय} करतात. शिरूर व पारनेर तालुक्यातील कांदा खरेदी करण्यासाठी लहानांपासून मोठे व्यापारी सरसावले आहे. पाच ते दहा लाख रुपये जवळ असले, तरी कांदा स्वस्तात घ्यायचा व भाव वाढला की विकायचा,असे करणा:या व्यापा:यांची संघटना तयार झाली आहे. भाव वाढल्याची बातमी येत असल्याने व यामुळे शेतक:यांत जागृती निर्माण होत असल्याने कांदा व्यापा:यांची चांगलीच गोची झाली आहे.