शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

...तर मुंबईत येणार, CM देवेंद्र फडणवीसांना इशारा; मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:54 IST

सगेसोयरे अंमलबजावणी लहान विषय नाही. यावेळी मुंबईला जाताना अडवले तर मंत्री, आमदारांना हाणायचं. मुंबईला नियोजनबद्ध जायचं असं जरांगेंनी म्हटलं

जालना - देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी १०० टक्के गद्दारी करणार नाही. ते आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केले तर लवकरच आम्ही मुंबईला येण्याची तारीख जाहीर करू. यावेळी मुंबई जाम होऊ शकते, मराठे माघारी येऊ शकत नाही. आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर पोरं बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघारी घेणार नाही असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पावणे दोन वर्ष मी सहन केले. आपण आज उपोषण स्थगित करतोय. आता शक्यतो उपोषण होणार नाही समोरासमोर लढायचं. मी फडणवीसांना उत्तर मागितले होते, पण त्यांनी काही दिले नाही. ८ मागण्या केल्या त्या पूर्ण करणार की नाही? मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही शब्द बोललो नाही. तुम्ही जर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला सुखी राहू देणार नाही. तुम्ही माझ्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा, समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, जर मागण्यांची अंमल बजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन असं त्यांनी सांगितले. 

तसेच आरक्षणासाठी मागील ६ दिवसापासून उपोषण करतोय. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सामुहिक उपोषण केले. इतके दिवस बसावे लागेल वाटलं नाही. परंतु सरकारकडून, मुख्यमंत्र्‍यांकडून बेईमानीच व्हायची असली आणि करायचे नसेल तर एक एक दिवस पुढे ढकलला येतो. कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली नाही. वंशावळ समिती बरखास्त केली. आपल्या मुळावर कुठे कुठे घाव घातला हे माहिती असणे गरजेचे आहे. सरसकट गुन्हे मागे घेऊ बोलले तेही घेतले नाहीत. सातारा, हैदराबाद गॅझेट लागू केले नाही. परंतु शिंदे समिती आम्ही ताबडतोब सुरू करतो असा २-३ दिवसांपासून निरोप आहे. एखाद्या गोरगरिब समाजाला किती घुमवायचं याला मर्यादा असतात. केसेस मागे घेतो अशा खलबता सुरू आहेत असं जरांगेंनी म्हटलं. 

दरम्यान, शिंदे समिती तातडीने सुरू करतो, पूर्वीसारख्या नोंदी शोधायला लावतो. याआधी नोंदणी झाली की प्रमाणपत्र मिळायचे. गावागावात नोंदी प्रमाणपत्र देण्याचं अभियान तत्कालीन शिंदे सरकारने राबवले होते. आता हे पुन्हा सुरू करतोय असा निरोप आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानंतर ती काम करत नाही असं दिसून येते. आता १ वर्ष मुदत वाढ दिली तर त्यांनी सलग नोंदी शोधण्याचं काम करायचे. त्या समितीवर मराठ्यांनी लक्ष ठेवायचे. प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष उभारले जातील त्यावर नजर ठेवायची. आपले जे अभ्यासक आहेत त्यांनीही शिंदे समितीसोबत जाऊन नोंदी शोधायच्या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केले. 

मंत्री, आमदारांना हाणायचं...

EWS च्या माध्यमातून ज्या पोरांनी प्रवेश घेतलेत ते तसेच ठेवा, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काही कुटुंबाला १० लाख रुपये मिळाले नाहीत. काहींना पैसे दिलेत, काहींना दिले नाहीत. सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्यात जे आक्षेप आलेत त्याची छाननी करून २-३ महिन्यात सगेसोयरे अंमल बजावणी केली पाहिजे. आता मुंबईला गेलो तर माघारी फिरणार नाही. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे असेल तर २०१२ चा कायदा दुरुस्त करावा लागेल. आता मुंबईला गेल्यावर अंमल बजावणी केल्यावरच माघारी येऊ. सगेसोयरे अंमल बजावणी लहान विषय नाही. यावेळी मुंबईला जाताना अडवले तर मंत्री, आमदारांना हाणायचं. मुंबईला नियोजनबद्ध जायचं असं जरांगेंनी म्हटलं. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस