औरंगाबादेत 10 लाखांच्या 500 आणि 1000च्या सापडल्या जुन्या नोटा
By Admin | Updated: June 11, 2017 13:42 IST2017-06-11T13:42:17+5:302017-06-11T13:42:17+5:30
500 आणि 1000 रुपयांच्या दहा लाखांहून अधिक नोटा सिडको एन -2 कामगार चौकाजवळील जंगले यांच्या रिकाम्या भूखंडावर बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले

औरंगाबादेत 10 लाखांच्या 500 आणि 1000च्या सापडल्या जुन्या नोटा
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11 - चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या दहा लाखांहून अधिक नोटा सिडको एन -2 कामगार चौकाजवळील जंगले यांच्या रिकाम्या भूखंडावर बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. जंगले यांच्या ओपन प्लॉट नं - 79वरच्या एका झाडावर 500 आणि 1000च्या नोटांचे बंडल एका पिशवीत भरून फेकून देण्यात आले आहेत. आज सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान या नोटा आढळून आल्या आहेत. पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण कापरे, एस. बी . सोहळे, माधुरी खरात यांनी घटनास्थळी जाऊन नोटा जप्त केल्या आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.