वृद्ध वडिलांस दरमहा ७५०० रुपये भत्ता द्या
By Admin | Updated: December 25, 2015 03:49 IST2015-12-25T03:49:06+5:302015-12-25T03:49:06+5:30
मुलाने लग्नानंतर अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे घर असूनही मंदिरात राहणाऱ्या वृद्ध वडील व कुटुंबीयांना दरमहा ७५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा

वृद्ध वडिलांस दरमहा ७५०० रुपये भत्ता द्या
अकोला : मुलाने लग्नानंतर अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे घर असूनही मंदिरात राहणाऱ्या वृद्ध वडील व कुटुंबीयांना दरमहा ७५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा, असे आदेश तक्रारकर्त्या वडिलांच्या मुलास अकोला उपविभागीय दंडाधिकारी संजय खडसे यांनी बुधवारी दिला. ज्येष्ठ नागरिकसंरक्षण कायदा २००७ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी हा आदेश पारित केला.